'अनिकेत कोथळेची पोलिस कोठडीत हत्या, त्याचा मृतदेह जाळला आंबोलीत'; उज्ज्वल निकम यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद, आरोपी लाडनं पोलिसांना असं काय दाखवलं?

Final Arguments Presented in Aniket Kothale Custodial Death Case : सांगली जिल्हा न्यायालयात अनिकेत कोथळे पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अंतिम युक्तिवाद करत आरोपींवर गंभीर आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
Aniket Kothale Custodial Death Hearing in Sangli Court

Aniket Kothale Custodial Death Hearing in Sangli Court

esakal

Updated on

सांगली : ‘अनिकेत कोथळे याची पोलिस कोठडीत अमानुष मारहाणीत हत्या झाली. त्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली येथे जाळण्यात (Aniket Kothale Custodial Death Case) आला. ते ठिकाण आरोपी क्रमांक दोन व बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे याच्या दप्तरी अनिल लाड याने पोलिसांना दाखवले,’ असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर केला. दरम्यान, गतवेळी झालेल्या उलट तपासात बचाव पक्षाच्या वकिलांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेचे ॲड. निकम यांनी खंडन करत अंतिम युक्तिवाद केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com