Miraj Crime News
esakal
सांगली : उत्तर प्रदेशमधील दाम्पत्य. चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात नेहमीचा वाद. त्याच वादातून पतीसह सासऱ्याने तिला मिरजेतील (Miraj Crime News) टाकळी ते मल्लेवाडी रस्त्यावर आणली. एका शेतात तिचा गळा घोटला आणि ते दोघे पसार झाले. कुजलेल्या अवस्थेत त्या महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी कौशल्यपणाला लावत त्यामागच्या कारणाचा शोध घेतला. अखेर चारित्र्याच्या संशयावरून पतीसह सासऱ्याने तिला मिरजेत आणून खून केल्याचे निष्पन्न झाले.