संशयितावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे करण्यात आली.
मिरज/एरंडोली : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील स्वाती रामचंद्र जाधव (वय १९) या तरुणीने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. गावातील साहील बबन डफेदार याने प्रेमसंबंधासाठी (love Affair) मानसिक दबाव आणल्याने तिने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात (Miraj Police) दिली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंद करण्यात येत होती.