Sangli police superintendent Tushar Doshi
esakal
सांगली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढलेली गुन्हेगारी आणि नशेखोरी नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी आक्रमक पाऊल उचलले असून, संपूर्ण सांगली पोलिस दल ‘ॲक्शन मोड’वर आले (Sangli police action against criminals) आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यालयाचा रस्ता दाखवत, त्यांनी जिल्ह्यात गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी एका एलसीबीसह स्थानिक पोलिसांना सक्त सूचना दिल्या आहेत.