सांगली : सह्याद्रीनगर (Sahyadri Nagar) परिसरातील मंगळवार बाजार परिसरात रेकॉर्डवरील गुंड हकीकउल्ला ऊर्फ फुलवा हसीउल्ला साहा (३७, प्रकाशनगर, कुपवाड) याचा खून टोळीयुद्धातूनच झाल्याचे तपासात समोर आले. संजयनगर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी (Sanjay Nagar Police) तिघा संशयितांना पाच तासांत गजाआड केले, तर एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. अन्य दोघे संशयित पसार आहेत.