याप्रकरणी अट्टल गुंड व यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सौरभ सुशील पाटील (रा. इस्लामपूर), जहांगीर मुजावर (रा. गोटखिंडी, ता. वाळवा) या दोघांसह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इस्लामपूर (सांगली) : एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या किरकोळ कारणावरून येथे यल्लम्मा चौकात (Yallamma Chowk) तिघांनी मिळून एकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून (Murder Case) केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. २७) रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली आहे. गौरव हेमंत कुलकर्णी (वय २०, रा. गणेश भाजी मंडई, इस्लामपूर) असे मृत युवकाचे नाव आहे.