सावधान, मगरी आक्रमक होतायत ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crocodile

सांगली : सावधान, मगरी आक्रमक होतायत !

शिराळा - उन्हाळा प्रचंड आहे. परीक्षा संपल्याने शाळांना सुट्या आहेत. मेच्या सुटीसाठी मुंबई, पुणे व बाहेर गावी असणारे लोक मुलाबाळांसह गावी येतात. मुले मामाच्या गावी येतात. उकाड्याने हैराण होऊन अंगाची लाही लाही होत आहे. अनेक मुले गावाजवळ नदी, विहिरी व तलावात पोहण्यास जातात. वारणा व कृष्णा काठी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी मुले दिवसभर नदीत असतात. अनेक ठिकाणी मगरींचा वावर आहे. मगरींच्या विणीचा हंगाम सुरु असल्याने त्या आक्रमक असतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात गेल्या १२ वर्षांत मगरींच्या हल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झालेत.

मगर ही पाण्यात वावरते व जमिनीवर राहते. जमिनीवर माती उकरून अंडी घालते व घरट्याचे संगोपन करते. एक - दीड महिन्यात घरट्यातील अंड्यातून मगरीची पिल्ले जन्मतात. अन्नासाठी पाण्यात उतरतात. मगर पिल्लांना शिकार करून अन्न भरवत नाही. दूध पाजत नाही. तर मगरीची लहान पिल्ले पाण्यात उतरून कीटक व लहान मासे खाऊन मोठी होतात. मगरीला रोजचे खाद्य फार कमी प्रमाणात लागत असल्याने त्या इतर प्राण्यांप्रमाणे शिकार करून साठवून ठेवत नाहीत. म्हणूनच मगर मोठ्या प्राण्यांची शिकार करतांना आढळत नाही. १२ वर्षांत मगरीचे हल्ले झालेल्या नोंदी पाहता अधिवासात धोका निर्माण झाल्यामुळे हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.

अशी घ्या काळजी

  • खोल पाण्यात उतरणे, धुणे धुणे, पोहणे, पाण्यात उतरून अंघोळ करणे

  • व खोल पाण्यात/पाण्याजवळ जनावरे घेऊन जाणे टाळावे.

  • मगरीचा वावर दिसत असेल तर पाण्यात जाणे टाळावे.

  • जनावरांना पाणी पाजताना काठावर उथळ जागेत जावे.

  • खोल पाण्यात उतरून कपडे धुणे टाळावे.

  • मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांवर मगरीचे हल्ले जास्त झालेले

  • आढळतात. लहान मुलांना पाण्यात सोडू नये.

१२ वर्षांत ९ मृत्यू, १६ जखमी

कसबे डिग्रज, भिलवडी (३), अंकलखोप, कासेगाव, चोपडेवाडी, तुंग, बह्मनाळ येथील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चोपडेवाडी (२), धनगाव(२),भिलवडी (२), कांदे (२), मांगले, नागराळे, कसबे डिग्रज, सांगली, तुंग (२), सुखवाडी, ब्रह्मनाळ येथील १६ जण जखमी झालेत.

Web Title: Sangli Crocodile Get Along Riverbed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top