Sangli : सायबर गुन्ह्यांच्या साखळीवर पोलिसांचा हातोडा

पोलिस यंत्रणा अशा पद्धतीच्या फसवणुकीचा छडा लावण्यात असमर्थ ठरत होती.
cyber
cyber Sakal

सांगली : ऑनलाईन व्यवहारात फसवणूक झाली तर पैसे विसरून जा, असे म्हणायला लागत होते. पोलिस यंत्रणा अशा पद्धतीच्या फसवणुकीचा छडा लावण्यात असमर्थ ठरत होती. परंतु, आता दिवस बदलले आहेत. पोलिसांच्या हाती नवे तंत्र आले असून, तरुण पोलिस कर्मचाऱ्यांच्या हाती सायबरची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे सामान्य गुन्ह्यांइतकीच शिताफीने आणि हुशारीने अशा प्रकरणांचा छडा लावला जात आहे. आठ महिन्यांत ११ प्रकरणांत पैसे परत मिळविण्यात यश आले असून, फसगत झालेल्यांना पाच लाख ७७ रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात आली आहे.

इंटरनेटचा वापर वेगाने वाढत आहे. स्वस्त डाटा आणि स्मार्टफोनमुळे सर्वसामान्य ऑनलाइन व्यवहार करत आहेत. केंद्र सरकार त्यासाठी आग्रही आहे. बँकेचे व्यवहार, महत्वाच्या कागदपत्रांची देवाण-घेवाण ऑनलाइन होत आहे. त्यातून ऑनलाइन गुन्हेगारीही वाढली आहे. यातील अज्ञान ही पहिली कडी असून तेथून पुढे लुटणारी साखळी तयारच आहे. राजस्थानमधील एका गावातील शेकडो तरुण हाच व्यवसाय करतात, अशी माहिती पुढे आली आहे. काही जण तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून तुमचे बँक खाते लूटू शकतात. त्याबाबत अनेकदा लोकांना सावध करण्यात आले, मात्र त्यानंतरही केवळ अज्ञानातून आणि नवनवे फंडा वापरून फसवणूक सुरु आहे. कधी वीज बिलांच्या माध्यमातून तर कधी क्रेडिट-डेबीट कार्डच्या माध्यमातून आर्थिक लूट केली जात आहे. सांगलीत गेल्या आठ महिन्यात सात लाख ७८ हजार ६५८ रूपयांची आर्थिक लूट झाल्याच्या ११ घटना घडल्या. सायबर शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे पाच लाख ७७ हजारा १५९ रुपये तक्रारदारांना मिळवून दिले आहेत.

इंटरनेटच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक फंडे वापरले जात आहेत. बँक कर्मचारी असल्याचे भासवून ओटीपी मागून घेत आर्थिक लुट करणे, तसेच गॅस सबसिडीची बतावणी अशा काही मिनिटांच्या फोन कॉल आणि एखादे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाउनलोड केल्याने लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे चोरले जात आहेत. उच्चवर्गासह मध्यमवर्गीय कुटुंबही अशा गुन्ह्यांना जास्त बळी पडताना दिसत आहेत. वीज बिलांच्या माध्यमातून आर्थिक लुटीच्या पाच घटना घडल्या आहेत. ग्राहकांच्या मोबाइलवर अनोळखी क्रमाकांवरून किंवा सिस्टिमद्वारे ‘वीज बिल थकीत आहे’, असा मेसेज पाठवून गोपनीय माहिती घेतली जाते. यानंतर ग्राहकाच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेण्यात आले.

सांगलीत गेल्या आठ महिन्यांत ११ गुन्हे सायबर शाखेत दाखल झाले. त्यात पोलिसांनी तांत्रिक तपास आणि कशापद्धतीने फसवणूक झाली याची तपासणी केली. या माध्यमातून संबंधित यंत्रणेला पोलिसी खाक्या दाखवत सर्वच तक्रारदारांना रक्कम परत देण्यात यश आले आहे. सायबर शाखेचे उपनिरीक्षक रोहिदास पवार, अंमलदार करण परदेशी, संदीप पाटील, अमोल क्षीरसागर यांनीही कारवाई केली.

स्क्रीन शेअर होते

मोबाईलवरील काही अॅप गुन्ह्यात वापरले जातात. अॅपद्वारे मोबाइलमधील डाटा संकलित करून फसवणूक होते. मोबाईलचे सारे स्क्रीन शेअरींग होतात. काही दिवसांपुर्वी माजी सैनिकालाही अशाच पद्धतीने ४५ हजारांचा गंडा घातला होता. याशिवाय पोलिसांनी वेळीच हे खाते गोठवून पैसे मिळवून दिले.

ही दक्षता घ्यावी...

  • अज्ञात लिंकवर क्लिक करू नये

  • बँक खात्याची माहिती देऊ नये

  • मोबाईल, संगणकाची स्क्रीन शेअर करू नका

  • कॉल किंवा मेसेजद्वारे आलेला ओटीपी कोणालाही पाठवू नका

  • ‘रिवॉर्ड पॉइंट’चे आमिष दाखविणाऱ्या अॅपला बळी पडू नका

  • माहिती शेअर झाल्यास एटीएम, डेबीट, क्रेडिट कार्ड ब्लॉक करावे

ऑनलाइनच्या माध्यमातून अनेकांची आर्थिक लूट झाल्याच्या घटना घडल्या आहे. अजाणतेपणात अशा घटना घडतात. अशावेळी सायबर शाखेशी संपर्क साधावा. सायबर सेल कडून याप्रकरणी जागृती करीत असून, सर्व तक्रार अर्ज त्वरित निकाली काढण्यावर भर दिला जातो. गेल्या आठ महिन्यांत ११ घटनांतील पाच लाख ७७ हजारांची रक्कम परत मिळवून दिली आहे.

- दीक्षित गेडाम, पोलिस अधीक्षक, सांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com