करेक्ट कार्यक्रम : जतचे आमदार विक्रम सावंत यांना पराभवाचा धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली : काँग्रेस-सेनेला नकोय भाजपची सोबत!

जिल्हा बॅंकेत काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांना पराभावाचा धक्का....करेक्ट कार्यक्रम....सोसायटीत गटात महाआघाडीची 6-1 ने बाजी

सांगली जिल्हा बँकेत आजी-माजी आमदारांचा पराभव

सांगली- सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सध्या सोसायटी गटातील निकाल हाती येत आहेत. १८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल तर भाजपचे शेतकरी पॅनेल आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सोसायटी गटात महाआघाडीचे उमेदवार व काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादीचे बंडखोर आणि भाजपच्या पॅनेलमधून लढणारे प्रकाश जमदाडे विजयी झाले. सोसायटी गटातील सात जागांमध्ये महाआघाडीने 6-1 ने बाजी मारली.

मिरजेतील शेतकरी भवनमध्ये आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. मिरज सोसायटी गटात महाआघाडीचे विशाल पाटील हे 52-16 विरुध्द मतांनी विजयी. भाजप पॅनेलचे उमेश पाटील पराभूत झाले.

जत सोसायटी गटात काॅंग्रेसला धक्का बसला. विद्यमान संचालक तथा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत पराभूत झाले. भाजपचे प्रकाश जमदाडे 45-40 मतांनी विजयी झाले.

आटपाडी सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे तानाजी पाटील 40-29 मतांनी विजयी झाले. भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख पराभूत झाले. कवठेमहांकाळ सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे अजितराव घोरपडे 54-14 मतांनी विजयी झाले. भाजपचे विठ्ठल पाटील पराभूत झाले.

तासगाव सोसायटी गटात महाआघाडीचे बी एस पाटील विजयी 41-23 मतांनी विजयी झाले. भाजपचे सुनिल जाधव व विद्यमान संचालक प्रताप पाटील पराभूत झाले. पाटील यांना 15 मते पडली.

वाळवा सोसायटी गटात विद्यमान अध्यक्ष महाआघाडीचे दिलीप पाटील 108-23 मतांनी विजयी झाले. भाजपचे भानुदास मोटे पराभूत झाले.

कडेगाव सोसायटी गटात महाआघाडीचे आमदार मोहनराव कदम 53-11 मतानी विजयी झाले. भाजपचे तुकाराम शिंदे पराभूत झाले.

loading image
go to top