Vishal Patil and Samrat Mahadik Meeting
esakal
सांगली : खासदार विशाल पाटील यांनी भाजपच्या सम्राट महाडिक यांना जाहीरपणे शुभेच्छा दिल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये वेगळाच रंग भरला आहे. दुसऱ्या बाजूला पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांची गुप्तगू झाल्याने या सर्व नव्या मैत्रीच्या घडामोडी मागचे रहस्य वाढले आहे. दरम्यान, माजी खासदार संजय पाटील यांनी चंद्रकांत पाटील व विशाल पाटील यांच्यावर मॅच फिंक्सिंगचा आरोप करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Sangli District Bank Election) ट्विस्ट निर्माण झाले आहे.