Suman Patil vs Sanjay Patil
esakal
तासगाव : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तासगाव तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्षाला धार आली आहे. तालुका विकास सोसायटी गटातून माजी आमदार सुमन पाटील आणि माजी खासदार संजय पाटील आमने सामने आले (Suman Patil vs Sanjay Patil Tasgaon election) आहेत. दोन्ही पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे नेतेच निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रतिष्ठा, राजकीय वर्चस्व आणि सहकारातील ताकद यांची या निमित्ताने कसोटी लागणार आहे.