सांगली जिल्ह्यात संततधार सुरूच

धरण पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार, वारणेच्या पातळीत वाढ
rain
rainsakal
Updated on

सांगली : धरण पाणलोट क्षेत्रातील धुव्वाधार पावसानंतर जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली. शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. खानापूर, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी येथे पावसाची रिमझिम सुरू होती. सांगली शहरातही दिवसभर पावसाच्या सरी झाल्या. पावसामुळे पेरणीयोग्य वातावरण तयार झाले असून, पुढील दोन दिवसांत पेरण्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

चांदोली, कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर सलग पाचव्या दिवशीही कायम आहे. संततधार पावसामुळे कृष्णा, वारणा नद्यांच्या पातळीतही वाढ होत आहे. कोयना धरणात २६.७०, चांदोलीत १५.८० टीएमसी पाणीसाठा झाला.

पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली, तरी जोर कमी होता. जिल्ह्याच्या बहुतांश भागांत आज जोरदार पाऊस झाला. शिराळा, वाळवा तालुक्यांत दमदार पाऊस सुरूच आहे. पलूस, मिरज, कडेगाव तसेच खानापूर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मध्यम पाऊस झाला. याशिवाय जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव तालुक्यांत रिमझिम पावसाच्या सरी झाल्या. कृष्णा, वारणा नदीपात्रात पाण्याची आवक वाढत आहे.

सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी आज सायंकाळी ७.६ फुटांवर पोचली. पावसाचा जोर सुरूच राहिल्यास पाणीपातळीत आणखी वाढ होईल. सांगली शहर परिसरात दिवसभर रिमझिम पावसाच्या सरी पडल्या. पावसाने ओढ दिल्याने मोठ्या प्रमाणात क्षेत्र पेरणीविना होते. परंतु, जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने पेरण्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले. त्यामुळे पुढील चार दिवसांत पेरण्यांना गती येण्याची शक्यता आहे.

काही भागांत उसाची आडसाल लागण केली जाते. आगाप पेरणी झालेल्या पिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सलग पाचव्या दिवशी आज सुरूच राहिला. चांदोली पाणलोटात गेल्या २४ तासांत ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील साठ्यात वाढ सुरू आहे; तर धरणात सध्या १५.८० टीएमसी साठा झाला. कोयना धरण पाणलोटात २४ तासांत ७५ मिलिमीटर पाऊस झाला. दिवसभरातही ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या धरणाचा साठा २६.२७ टीएमसी आहे. नवजा आणि महाबळेश्वर या पावसाच्या आगारांत अतिवृष्टी सुरूच आहे. तेथे २४ तासांत अनुक्रमे ८९ आणि १३५ मिलिमीटर पाऊस झाला. अलमट्टी धरणातील साठ्याची क्षमता १२३ टीएमसी असून, सध्या ७०.५७ टीएमसी साठा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com