
सन 2020 ते 2025 कालावधीसाठी सांगली जिल्ह्यातील 699 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षणाचा तालुकानिहाय प्रवर्ग निश्चित करण्यात आला आहे.
सांगली ः सन 2020 ते 2025 कालावधीसाठी सांगली जिल्ह्यातील 699 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षणाचा तालुकानिहाय प्रवर्ग निश्चित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील 699 ग्रामपंचायतींचे सन 2020 ते 2025 कालावधीसाठी तालुक्यामधील एकूण ग्रामपंचायतीच्या बाबतीत सरपंच आरक्षण काढण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित तहसीलदार यांना आरक्षण काढण्यासाठी नेमणूक केली आहे. सरपंच आरक्षण 16 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत. तालुक्याच्या मुख्यालयात नियमानुसार आरक्षण काढले जाणार आहे.
सन 2020-2025 साठी तालुकानिहाय व प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण असे. मिरज तालुका- प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 8 (सर्वसाधरण -4 व महिला -4), अनुसूचित जमातीसाठी 1 (सर्वसाधारण), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 17 (सर्वसाधारण-8 व महिला 9) खुल्या प्रवर्गासाठी -38 (सर्वसाधारण 19 व महिला 19).
तासगाव तालुक्यासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 7 (सर्वसाधरण- 3 व महिला- 4), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 18 (सर्वसाधारण-9 व महिला 9), खुल्या प्रवर्गासाठी -43 (सर्वसाधारण 21 व महिला 22).
कवठेमहांकाळ तालुका- प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी- 8 (सर्वसाधरण-4 व महिला -4), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 16 (सर्वसाधारण-8 व महिला 8) खुल्या प्रवर्गासाठी- 35 (सर्वसाधारण 17 व महिला 18).
जत तालुका- प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी- 14 (सर्वसाधरण- 7 व महिला -7), अनुसूचित जमातीसाठी 2 (सर्वसाधारण -1 व महिला -1), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 31 (सर्वसाधारण-15 व महिला 16) खुल्या प्रवर्गासाठी - 69 (सर्वसाधारण 34 व महिला 35)
खानापूर तालुका- प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 9 (सर्वसाधरण -4 व महिला -5), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 17 (सर्वसाधारण-8 व महिला 9) खुल्या प्रवर्गासाठी- 38 (सर्वसाधारण 19 व महिला 19). आटपाडी तालुका- प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी- 7 (सर्वसाधरण -3 व महिला -4), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 15 (सर्वसाधारण-7 व महिला 8) खुल्या प्रवर्गासाठी - 34 (सर्वसाधारण 17 व महिला 17).
कडेगाव तालुका- प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी- 6 (सर्वसाधरण -3 व महिला -3), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी- 15 (सर्वसाधारण-7 व महिला 8) खुल्या प्रवर्गासाठी- 33 (सर्वसाधारण 16 व महिला 17).
पलूस तालुका- प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 4 (सर्वसाधरण -2 व महिला -2), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 9 (सर्वसाधारण-4 व महिला 5), खुल्या प्रवर्गासाठी - 20 (सर्वसाधारण 10 व महिला 10).
वाळवा तालुका- प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी- 11 (सर्वसाधरण -5 व महिला -6), अनुसूचित जमाती-01 (महिला) नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 26 (सर्वसाधारण-13 व महिला- 13) खुल्या प्रवर्गासाठी- 56 (सर्वसाधारण- 28 व महिला- 28)
खानापूर तालुका- प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 9 (सर्वसाधरण -4 व महिला -5), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 25 (सर्वसाधारण-13 व महिला- 15) खुल्या प्रवर्गासाठी- 57 (सर्वसाधारण- 28 व महिला 29).
संपादन : युवराज यादव