

Sangli civic leaders
sakal
सांगली : अडीच-तीन वर्षांचे प्रशासकराज संपले आणि अखेर जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. महापालिकेत भाजप व राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता स्थापन झाली. जिल्हा परिषदेत तिढा सोडवला जातोय. तोही आठवडाभरात विषय संपेल. त्यानंतर जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडीचा कार्यक्रम लागेल. पालकमंत्री त्याचा कार्यक्रम निश्चित करतील.