Koyna Dam additional water demand for Sangli
esakal
सांगली : जिल्ह्यातील चार तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. आणखी काही तालुक्यांत टंचाईची घोषणा होण्याची शक्यता (Koyna water allocation) आहे. या स्थितीत टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ सिंचन योजना पूर्ण क्षमतेने आणि कदाचित नोव्हेंबरपासूनच चालवाव्या लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना धरणातून सिंचनासाठी ४२.७ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध केला जातो. यंदा आणखी २० ते २५ टीएमसी अतिरिक्त पाणी लागेल, अशी शक्यता आहे. परिणामी, जलविद्युत निर्मितीसाठी राखीव असलेल्या ६७ टीएमसी पाण्यात कपात करावी लागणार आहे. राज्य शासन या महिन्यातच त्याबाबत निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.