
सांगली : नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन साठा प्रकरणातील मुख्य वितरक आता पोलिसांच्या रडारवर असून, त्याचा शोध घेतला जात आहे. नशा करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, आज काही संशयितांकडे महात्मा गांधी पोलिसांनी चौकशी केली असून, वीसजणांची यादी पोलिसांसमोर आली आहे. लवकरच धक्कादायक माहिती समोर येईल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.