सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. ३१) उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर पक्षाच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रचार सुरू केला आहे..पहिल्याच टप्प्यात उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठींला सुरुवात झाली आहे. प्रचारातील पहिल्या टप्प्यात अनेक उमेदवार थेट मतदारांच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद घेतानाचे चित्र आहे. मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे..Gadhinglaj Muncipal : वीस दिवसांच्या प्रचारानंतर अखेर ‘हुश्श’… गडहिंग्लज प्रभाग तीनमधील मतदारांना दिलासा.उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत उद्या (२) आहे. त्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराला आणखी गती येणार आहे. घरोघरी जाऊन संपर्क, नातेसंबंधांना उजाळा दिला जातो आहे. .उमेदवारांनी सकाळी व सायंकाळच्या सत्रात प्रभागनिहाय घरोघरी भेटी देत कुटुंबीयांची चौकशी, अडचणी ऐकून घेणे, विकासकामांचे आश्वासन देणे असा दिनक्रम सुरू आहे. अनेक ठिकाणी मतदारांच्या पायावर डोके ठेवून नम्रपणे मताची विनंती केली जात असल्याने प्रचाराला वेगळाच भावनिक रंग चढला आहे..Sangli Politics : पक्षांचे जाहीरनामे येण्याआधीच जनतेचा आवाज; सांगलीत ‘जनतेचा जाहीरनामा’ चर्चेत.मतदारांत नाराजी, राजकारणाबद्दलची उदासीनता आणि वाढती अपेक्षा पाहता उमेदवारांकडून नम्रतेचा मार्ग स्वीकारला जात आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर आपुलकीच्या नात्यावर मतदान मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि समाजातील प्रतिष्ठित घटकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे..मतदारांच्या पायावर डोके ठेवतानाचे उमेदवारांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही नागरिकांनी कौतुक केले असून ‘उमेदवारांना नम्रता आली’ अशी प्रतिक्रिया दिली जात आहे, तर काहींनी केवळ ‘निवडणूक स्टंट’ असल्याचे म्हटले आहे..रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, अतिक्रमण, आरोग्य सुविधा अशा मूलभूत प्रश्नांवरच चर्चा आहे. उमेदवारांकडून भावनिक आवाहन होत असले तरी मतदार विकासकामांवर भूमिकांवर बोट ठेवत आहेत. .पहिल्या टप्प्यात ‘भेटीगाठी आणि नम्रता’ यावर भर असला, तरी पुढील टप्प्यात कोपरा सभा, प्रचार रॅली आणि आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. युवकांचे पॅनेल. .प्रचाराच्या कालावधीत उमेदवारांना एखादा मित्र, जुना सहकारी, वर्गमित्राची भेट झाली तर आमची मैत्री किती जुनी, किती सल्लामसलत होते आणि तुम्हीच आमचे कसे मार्गदर्शक आहात, हे अन्य लोकांसमोर पटवून दिले जात आहे. .आमचे पॅनेल युवकांचे असून विकासासाठी किती पळणार आहोत, याची जाणीवही करुन दिली जात आहे. शेवटी विकासासाठी आम्हालाच मते द्या, अशी विनवणी केली जात आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.