सांगलीत महापुराची स्थिती आणखी गंभीर, हजारो कुटुंबे पुराच्या वेढ्यात

बलराज पवार
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

शहरात महापुराची स्थिती आणखी गंभीर झाले आहे आज सकाळी सहा वाजेपर्यंत आयुर्वेदिक फुलाची पाणी पातळी 56 फूट आठ इंच इतकी होती शहरातील कॉलेज कॉर्नर, माधवनगर रोड हिराबाग कॉर्नर, सिव्हिल हॉस्पिटल आदी परिसरात पाणी भरले आहे. यापूर्वी कधीही पुराचे पाणी न आलेल्या भागात पाणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज दिवसभरात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आणखी किती पाणी वाढणार याची धास्ती शहरवासीयांनी मध्ये आहे.

सांगली - शहरात महापुराची स्थिती आणखी गंभीर झाले आहे आज सकाळी सहा वाजेपर्यंत आयुर्वेदिक फुलाची पाणी पातळी 56 फूट आठ इंच इतकी होती शहरातील कॉलेज कॉर्नर, माधवनगर रोड हिराबाग कॉर्नर, सिव्हिल हॉस्पिटल आदी परिसरात पाणी भरले आहे. यापूर्वी कधीही पुराचे पाणी न आलेल्या भागात पाणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज दिवसभरात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आणखी किती पाणी वाढणार याची धास्ती शहरवासीयांनी मध्ये आहे. 

शहरातील शंभर कोटी परिसरातील डी मार्ट आणि त्याच्या मागील परिसरही आज पुराच्या पाण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे येथील नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

प्रशासनाचे मदत कार्य तोकडे पडत असून हजारो कुटुंबे पुराच्या वेढ्यात अडकले आहेत.

सांगलीत पुराचे पाणी वाढतच आहे. पाणी संथ गतीने वाढत आहे. मात्र शहराच्या विविध भागात पसरत चालले आहे. त्यामुळे नवीन परिसर पुराच्या वेढ्यात येत आहे. त्यामुळे पुरात अडकणाऱ्या या कुटुंबाची संख्या वाढत चालली आहे या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाची यंत्रणा तोकडी पडत आहे. महापालिकेकडे चार बोटी आहेत. त्यातील दोन बंद पडले आहेत तर एनडीआरएफ पथकाकडेही अपुरी यंत्रणा असल्यामुळे नागरिकांना बाहेर काढणे अवघड होत आहे. आता शहरातील हॉस्पिटल सही पुराच्या वेढ्यात आले आहेत. त्यामुळे येथील रुग्णांना बाहेर काढणे आवश्यक बनले आहे.

शिवाय स्थलांतरित केलेल्या पूरग्रस्तांना मदत पोहोचविणे ही जिकिरीचे होत आहे. शहरात सुमारे बारा हजार लोकांचे स्थलांतर केले आहे. त्यांचे 34 ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. पण या सर्वांना जीवनावश्यक सुविधा देणे जिकिरीचे बनले आहे. प्रशासन आणि सामाजिक संस्था आपल्या परीने प्रयत्न करत आहेत.

जिल्ह्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महापुराचा दणका बसला आहे. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या महापुरापेक्षाही भीषण परिस्थिती यंदा झाली आहे. अद्याप हजारो नागरिक अडकल्याने त्यांना मदत पोहोचविणे आणि सुरक्षित बाहेर काढणे याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे आज प्रशासनाने एनडीआरएफची आणखी पथके तसेच आणखी बोटी मागवले आहेत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आज महापुराचे पाहणी करण्यासाठी सांगता येत आहेत. आज दुपारी महापूराची हवाई पाहणी करून ते कॉलेज कॉर्नर वरील महाविद्यालयात स्थलांतरित केलेल्या पूरग्रस्तांची भेट घेणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Flood Rain Water Dangerous Family Life Disturb