सांगली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गैरकृत्य प्रकरणी चौघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात

सांगली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गैरकृत्य प्रकरणी चौघांना अटक

शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे (ता. शाहूवाडी) येथील गाभा क्षेत्रात विनापरवाना शस्त्रास्त्रासह घुसलेल्या चौघांना वनविभागाने शोध घेऊन अटक केली. संदीप तुकाराम पवार, (रा. हातिव- गोठणे पुनर्वसन), मंगेश जनार्दन कामतेकर, अक्षय सुनील कामतेकर, (रा. गुरववाडी, मारळ ता. संगमेश्वर), रमेश तुकाराम घाग (रा. बामणोली ता. संगमेश्वर) अशी त्यांची नावे असून, यापैकी एकाच्या मोबाईलमध्ये चक्क घोरपडसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा व्हिडिओ व शिकार केलेल्या अन्य प्राण्यांचे फोटो आढळून आले आहे. त्यामुळे हे प्रकरण शिकारीपुरते मर्यदित राहिलेले नसल्याने तपासा अंती अनेक बाबींचा उलघडा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान या चौघांना अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमे-यात ३१ मार्च रोजी संशयित दिसून आले होते.त्याचा वनगुन्हा वनरक्षक रामदास दणाने यांनी दाखल केला आहे. वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी या घटनेबाबत कराडच्या विभागीय कार्यालयास माहिती दिली होती. त्यानुसार विभागीय कार्यालयातून सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे, फिरते पथकाचे शिशुपाल पवार यांनी चांदोली येथे तपास पथक तयार करून पुढील तपासाची दिशा ठरवली. तपास पथकाने सर्वप्रथम आंबा घाटातून व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिमेकडील उतारावरील आसपासच्या गावात चौकशी केली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १ एप्रिल रोजी हातिव( गोठणे पुनर्वसित ) गावात जाऊन तपास केला. त्यावेळी संदीप तुकाराम पवार,(रा. हातिव- गोठणे पुनर्वसन) हा संशयीत आढळून आला.त्याला चौकशीसठी ताब्यात घेतले.

२ एप्रिलला तपासाअंती या प्रकरणात अजून दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मारळ( ता. संगमेश्वर) येथील मंगेश जनार्दन कामतेकर व अक्षय सुनील कामतेकर या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. या दोघांना रत्नागिरी न्यायालयात हजर केले असता गुरुवार (ता. ७) पर्यंत वनकोठडी सुनावली. त्यानंतर मंगळवारी (ता.५) रमेश तुकाराम घाग (रा.बामणोली ता. संगमेश्वर) या चौथ्या संशयितास ताब्यात घेण्यात आले. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी , एक बंदूक व बॅटरी वन विभागाने जप्त केली आहे. चौथ्या संशयितांसही गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

संशयिताच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडिओत कोण आहे, हे आताच सांगता येणार नाही, पण त्यांचे विकृत कृत्य दिसून येत आहे. त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ व कायदे तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई केली जाईल. आणखी काही माहिती हाती लागते का, याची ही चौकशी सुरू आहे.

- विशाल माळी, विभागीय वनाधिकारी

Web Title: Sangli Four Arrested Misconduct Sahyadri Tiger

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..