सांगली : गाताडवाडी येथे दोन मोटारींच्या धडकेत चार ठार; चार जखमी

समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील पती-पत्नी, आई, भावजय असे चौघे जण ठार
पोलिस निरीक्षक ए. एन. बाबर, राजू पाटील, अशोक जाधव, पोलिस नाईक ढेपणे घटनास्थळी दाखल
पोलिस निरीक्षक ए. एन. बाबर, राजू पाटील, अशोक जाधव, पोलिस नाईक ढेपणे घटनास्थळी दाखलsakal
Updated on

आष्टा: दोन मोटारींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील पती-पत्नी, आई, भावजय असे चौघे जण ठार झाले; तर पुतणीसह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. आष्टा-इस्लामपूर रस्त्यावरील गाताडवाडी (ता. वाळवा) येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. कार चालक दत्ता पांडुरंग गडदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आष्टा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

या अपघातात गीताबाई जगन्नाथ पोळ (वय ७०), अधिकराव जगन्नाथ पोळ (४९), सुषमा अधिकराव पोळ (४५), सरिता सुभाष पोळ (३५, सर्व राहणार आगाशिवनगर-कऱ्हाड) हे ठार झाले, तर समृद्धी सुभाष पोळ (४, कऱ्हाड), मोटारचालक दत्तात्रय पांडुरंग गडदे, तसेच प्रकाश शेट्टी, साजिद अन्सारी (सर्व राहणार सांगली) हे जखमी झाले आहेत. यातील समृद्धी पोळ हिची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला कोल्हापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले आहे.

येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले आहे.

याबाबतची पोलिसांनी दिलेली व मिळालेली माहिती अशी : शनिवारी (ता. २६) सकाळी दहाच्या सुमारास अधिकराव पोळ हे आई गीताबाई, पत्नी सुषमा, भावजय सरिता, पुतणी समृद्धी यांना घेऊन मोटारीने (एमएच ५०, ए २७६४) कराडहून इस्लामपूरमार्गे सांगलीवाडी येथील पाहुण्यांकडे कार्यक्रमासाठी निघाले होते. ते गाताडवाडी फाट्यानजीक आले असता, पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीची सांगलीहून इस्लामपूरकडे निघालेल्या मोटारीशी (एमएच १०, सीआर ०६९०) समोरासमोर धडक झाली. या अपघातात गीताबाई व सुषमा पोळ या जागीच ठार झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एन. बाबर, राजू पाटील, अशोक जाधव, पोलिस नाईक ढेपणे घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी इस्लामपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. समृद्धी व सरिता यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील प्रभू हॉस्पिटलमध्ये, तर अधिकराव यांना कराड येथे हलवण्यात आले. उपचारांदरम्यान अधिकराव व सरिता यांचा मृत्यू झाला. चिमुकल्या समृद्धीची प्रकृती गंभीर आहे. प्रकाश शेट्टी, साजिद अन्सारी, दत्ता गडदे त्यांच्या हाता पायाला दुखापत झाली आहे. पोलिस निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सायंकाळी प्रकाश हॉस्पिटल येथे भेट देऊन जखमींची चौकशी करून त्यांच्याकडून अपघाताची माहिती जाणून घेतली. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
bribery case in Sangli district
Maharashtra Sugar Market
Marathi News Esakal
www.esakal.com