Sangli Gas : गॅस सिलिंडर पुरवठा बंद, हॉटेल व्यवसाय संकटात ; चालकांची आज बैठक ग्रामीण भागात चुलींवर स्वयंपाक
LPG Supply Crisis : आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात गॅस सिलिंडर तुटवड्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद झाल्याने हॉटेल व्यवसायावर मोठे संकट आले आहे.
सांगली : आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम दिसू लागला आहे. हॉटेलसाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद झाला आहे.