
-विष्णू मोहिते
सांगली : दिवाळीनंतर बेदाणा दरात प्रतिकिलोस सरासरी ४० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्याची आवक आणि बाजारात उपलब्ध जुना बेदाणा बाजारात येत आहे. परिणामी यंदाचे वर्ष बेदाणा उत्पादकांसाठी तेजीत राहण्याचे संकेत आहेत. एक महिना लवकर म्हणजे मार्चमध्ये होळी व रमजान सण आहेत. येत्या महिनाभरात मागणी वाढल्यास बेदाण्यास २२० ते २५० रुपये दर मिळणे शक्य आहे. नैसर्गिक संकटामुळे ४० टक्के द्राक्ष उत्पादन घटल्यामुळेही द्राक्षाला चांगला दर आहे.