Gram Panchayat Election : उमेदवारी चाचपणीतून ‘तू तू-मैं मैं’ सुरू

साठ गावांत रणसंग्राम; जिल्हा परिषद-पंचायत समितीची रंगीत तालीम
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSakal

शिराळा : शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची रंगीत तालीम निवडणुकीच्या माध्यमातून पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे ६० गावांत थेट सरपंच निवडीसाठी उमेदवार कोण, यासाठी गावोगावी इच्छुकांच्या गुप्त बैठकांला जोर आला आहे. उमेदवारी चाचपणीतून आतापासून काही गावांत प्राथमिक टप्प्यात गटांतर्गतच ‘तू तू-मैं मैं’ सुरू झाले आहे.

निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांची थेट लढत असली तरी काही गावात काँग्रेस, मनसे, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार व स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाडिक युवाशक्ती यांची स्वतंत्र मोट बांधण्याचे काम सुरू झाले आहे. तेव्हा पक्षातील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे गावकारभाऱ्यांकडून प्रभावी उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. काही गावांत सरपंचपदाचे आरक्षण असल्याने योग्य उमेदवार व त्यासाठी लागणारे जातीचे दाखले जमा करण्यासाठी प्रमुख नेत्यांना धावपळ करावी लागणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक पक्षापेक्षा भाऊबंदकीवर अधिक अवलंबून असते. ‘मी नाही, तर तू पण नाही’, ‘तुझ्यापेक्षा विरोधक परवडला,’ म्हणून आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आतापासून रणनीती आखण्यास सुरवात झाली आहे. सध्या थेट जनतेतून सरपंचनिवड असल्याने या उमेदवारी चाचपणीतून आतापासून काही गावांत प्राथमिक टप्यात ‘तू तू-मैं मैं’ सुरू झाले आहे. त्यामुळे नेते मंडळींना नाराजांची मनधरणी करताना कसरत करावी लागणार आहे. बंडोबांना थंड करणे डोकेदुखी ठरणार आहे. आपल्या विचाराची ग्रामपंचायत यावी, उमेदवार सक्षम असावा, यासाठी नेत्यांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

...या गावांत वातावरण गरमागरम

कोकरूड, चरण, मणदूर, आरळा, सोनवडे, खुंदलापूर, वाकाईवाडी, काळुंद्रे, हातेगाव, शेडगेवाडी, वाकुर्डे खुर्द, अंत्री खु., अंत्री बु., करमाळे, भटवाडी, रेड, खेड, बेलदारवाडी, भैरववाडी, पाचुंब्री, मांगले, सागांव, कांदे, चिखली, वाडीभागाई, ढोलेवाडी, कापरी, नाटोली, बिऊर, देववाडी, औंढी, धामवडे, पाडळी, पं. त. शिराळा, टाकवे, मांगरूळ, निगडी, मोहरे, शिराळे खुर्द, कणदूर, नाठवडे, पाडळीवाडी, उपवळे, शिवारवाडी, गिरजवडे, फुपेरे, घागरेवाडी, गुढे, माळेवाडी, कोंडाईवाडी, खिरवडे, पावलेवाडी, शिंदेवाडी, चिंचोली, गवळेवाडी, किनरेवाडी, येळापूर, पुनवत, तडवळे, लादेवाडी या गावांत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांमुळे वातावरण तापू लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com