Maharashtra farmer death due to crop loss
esakal
शिरढोण (सांगली) : मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Grape Farmer Death Maharashtra) केली. प्रतापराव श्रीपतराव शिंदे (वय ५०, रा. मळणगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हा प्रकार मंगळवार सकाळी अकराच्या दरम्यान उघडकीस आला. याची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे.