
सांगली : गेल्या महिनाभरात सांगलीत बांधकाम क्षेत्रातील दोन प्रदर्शने पार पडली. दोन्ही प्रदर्शनांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षभरात रो हाऊस, सदनिका, गाळे यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसते; मात्र त्याच वेळी अपुरी ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा आणि अंतर्गत रस्ते हे कधी सुधारणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.