esakal | हरिपूरमध्ये विटभट्टी कामागाराचा निर्घृण खून | Sangli
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रम रमेश वाघमारे

Sangli : हरिपूरमध्ये विटभट्टी कामागाराचा निर्घृण खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : मिरज तालुक्यातील हरिपूर येथे पूर्ववैमनस्यातून विक्रम रमेश वाघमारे (३०, रा. लक्ष्मी मंदिर, हरिपूर) या वीट भट्टी कामगाराचा खून करण्यात आला आहे. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास हरिपूर येथील पिंगळे मैदानावर घडली. सांगली ग्रामीण पोलीसानी या ठिकाणी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते आहे. पुर्वीच्या भांडणातून हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की विक्रम वाघमारे हा विटभट्टी कामगार आहे. वाघमारे आणि पिंगळे यांच्यात पूर्वीचा वाद होता. या वादातून न्यायालयीन खटलाही उभा राहिला आहे. हा खटला मागे घ्या म्हणून विक्रम वाघमारे आज दुपारी पिंपळे यांच्या घरासमोर जाऊन दंगा करत होता.

हेही वाचा: Chipi airport: पवार-राणेंच्यामध्ये बसणार मुख्यमंत्री; पहा वादग्रस्त निमंत्रण पत्रिका

वाद टोकाला केल्यानंतर संशयित राहुल पिंगळे याने कुऱ्हाडीने डोक्यात हल्ला केला. यात विक्रम वाघमारे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर टोक्यात दगड घालण्यात आला. अतिरक्तस्त्राव झाल्याने विक्रम याचा मृत्यू झाला. ही घटना घडल्याची समजताच सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी काही संशयितांना ताब्यात घेतले तर वाघमारे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. रुग्णालय परिसरात गर्दी होती.

loading image
go to top