New Irwin Bridge heavy vehicle restrictions
esakal
सांगली : दिवाळी सणाच्या काळात हरभट रस्त्यावरून सुरू असलेल्या जड व अवजड वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीची अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली (New Irwin Bridge heavy vehicle restrictions) आहे. कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर नवीन पुलावरून होणाऱ्या जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीला २ नोव्हेंबरपासून तीस दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी हे आदेश दिले.