Sangli : मूकबधिरता, अंधत्व, अपंगत्वावर होमिओपॅथीने मात

औषधांपेक्षा निसर्गाचे ज्ञान व निसर्गाने बनविलेले होमिओपॅथी उपचार हे कर्करोग, पोलिओ, मधुमेह व जन्मजात व्यंगांवर परिणामकारक होत आहेत.
filed image
filed imagee sakal

‘जो चीज दर्द देगी, वो दवा भी देगी।’ या आश्चर्यकारक संकल्पनेवर होमिओपॅथी आधारलेली आहे. दवाखान्यात अ‍ॅडमिट न होता कोणताही असाध्य आजार कमी खर्चात होमिओपॅथीद्वारे मुळापासून बरा होतो. अनुवंशिकता व अँटिमाज्मेटिक थेरपीचा वापर करून मूकबधिरता, अपंगत्व व अंधत्व यामध्ये चांगले यश रुग्णांना आलेले आहे.

- डॉ. प्रदीप पवार, होमिओपॅथी तज्ज्ञ

शरीराला निर्जीव रोगाप्रमाणे वागवून चालणार नाही. आनंदाची बाब म्हणजे काळाच्या ओघात आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार करून निसर्गापासून दूर गेलेला, कृत्रिम गोष्टींना महत्त्व देणारा माणूस आपली चूक कळाल्यामुळे परत निसर्गाकडे वळला आहे. नैसर्गिक जीवनशैलीचा अंगीकार करताना दिसत आहे. योगासनामुळे त्याला जिज्ञासा मिळते.

तद्वतच मनुष्य होमिओपॅथी या निसर्गाकडे वळत आहे. मानवाने बनविलेल्या रासायनिक औषधांपेक्षा निसर्गाचे ज्ञान व निसर्गाने बनविलेले होमिओपॅथी उपचार हे कर्करोग, पोलिओ, मधुमेह व जन्मजात व्यंगांवर परिणामकारक होत आहेत.

निसर्ग हा स्वत:मध्येच परिपूर्ण आहे, हे होमिओपॅथी औषधोपचारांनी बरे झालेल्या बालकांपासून ते वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. डॉ. हानिमन यांनी निसर्गातील ३७२ प्रकारची पाने, फुले, मुळ्या व खनिजे आणि मूलद्रव्यापासून जी औषधे बनविली, त्यांचा त्यांनी ‘महेरीका मेडिका’ या ग्रंथांद्वारे ऊहापोह केला आहे. सर्व व्यक्ती दिसायला भिन्न असल्या तरी त्यासाठी भिन्न औषधे, प्रत्येक औषधांच्या लक्षणांचा सखोल अभ्यास असणे होमिओपॅथीतज्ज्ञाला आवश्‍यक असते.

हृदयरोग, किडनीचे रोग, कान-नाक-घसा, पोटविकार, लैंगिक आजार व त्वचारोगाच्या रुग्णांना बरे करण्याचे काम होमिओपॅथी करीत आहे. कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्टस् नसल्याने होमिओपॅथी हे एक उपयुक्त वैद्यकशास्त्र म्हणून सर्व प्रकारच्या आजारांवर रामबाण उपाय ठरत आहे.

होमिओपॅथीतज्ज्ञ साबूदाण्यासारख्या आकाराची औषधे देतात, तेव्हा रुग्णांची सर्व विस्तृत माहिती घेतली जाते. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाला वेगळ्या उपचारांची गरज असते. होमिओपॅथी औषधांच्या लहान मात्रेत रोगनिदानची युक्त शक्ती असते.

गुडघेदुखीच्या रुग्णांना दोन ते तीन लाख रुपये खर्चून कृत्रिम गुडघे बसविण्यापेक्षा गुडघ्याची झीज औषधाने भरून काढणे, हे केव्हाही चांगलेच. उंची कमी असलेली मुले, मतिमंद, गतिमंद मुले, तोतरे बोलणे, अंधत्व, हाता-पायाची पुरेशी वाढ न झालेली मुले, कुबड असणारी व छातीला पोक असणारे वृद्ध, हार्नियाचे रुग्ण,

मूळव्याध, भगेंद्र, केसांच्या तक्रारी, वंधत्व, स्त्रियांच्या गर्भाशयाची सूज, पाळीच्या तक्रारी, डीव्हीटी रोग, थायरॉईड, सोरियासिस किंवा औषधोपचारांना दाद न देणाऱ्‍या सर्वच आजारांवर होमिओपॅथी गुणकारी आहे. कित्येक दुर्धर आजारांवर होमिओपॅथीचे चमत्कारिक यश पाहिल्यानंतर खरोखरच निसर्गाची मानवी जीवनाला एक अनमोल देणगीच आहे, असे म्हणावेसे वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com