
Sangli Robbery : कोल्हापूर रोडवरील ‘माई ह्युंदाई’ शोरूममध्ये चोरी प्रकरणी टोळीचा प्रमुख दिनेश गजेंद्र मोहिते (वय २७, लवाछा, ता. वापी, गुजरात) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची कोठडी मिळाली. या चोरीतील अन्य चौघे अद्याप पसार आहेत. त्यांच्या शोधासाठी सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक गुजरातला जाणार असल्याचे निरीक्षक किरण चौगले यांनी सांगितले.