

Sangli
esakal
सांगली: कॅफेतील अत्याचारानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांच्यासह संघटना आज आक्रमक झाली. त्यांनी विश्रामबाग, शहर परिसरातील आठ कॅफेवर छापे टाकले. धक्कादायक बाब म्हणून पोलिस मुख्यालयासमोर अवैध कॅफेंचा विळखा दिसून आला. तेथे मिनी लॉजेसह अश्लील चाळे करण्यासाठी जागा दिल्याचा पंचनामा पोलिसांसमोरच केला. शिवप्रतिष्ठानच्या या भूमिकेमुळे कॅफेवाल्यांचे धाबे दणाणले. अवैध कॅफेंविरोधात श्री. चौगुले यांनी ८ जूनला पालकमंत्र्यांना याविरोधात निवेदन दिले होते.