
सांगली : दिवाळखोरी जाहीर केलेल्या केन ॲग्रो एनर्जी लि. रायगाव या कंपनीच्या साखर कारखान्याकडे जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जाचे अडकलेले २२५ कोटी रुपये वसूल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील १६० कोटी रुपये मुद्दल आहे. या कर्जवसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर (एनसीएलटी) सादर करण्यात आलेला वसुली प्लॅन मंजूर झाला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होणार आहे.