Criminal apprehended : घरफोडीतील गुन्हेगार सांगलीत जेरबंद : ‘एलसीबी’ची कारवाई; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Sangli Crime News : पोलिसांनी तत्काळ सापळा लावून सुदर्शन यादव, मुनीब भाटकर, दीपक आवळे अशा तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने आणि २१ हजार रुपयांची रोकड मिळाली.
Sangli in House burglary criminal apprehended LCB action
Sangli in House burglary criminal apprehended LCB action Sakal
Updated on

सांगली : घरफोडीतील तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांनी चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, असा साडेचार लाखांचा ऐवज हस्तगत केला. मिरज येथील मार्केट यार्डात सुदर्शन सुनील यादव (वय १९, भोसे, ता. मिरज), मुनीब मुस्ताक भाटकर (वय १९, आंबा चौक, यशवंतनगर), दीपक गंगा आवळे (वय २०, शंभर फुटी रस्ता, गुलाब कॉलनी, सांगली) असे तिघे पोलिसांच्या हाती लागले. या टोळीतील अक्षय ऊर्फ पिंट्या दोडमणी (वाडे फाटा, सातारा) हा पसार झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com