Sangli Crime : नऊ दिवसांत सहा पसार, तीन हद्दपारांना पकडले; पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाची कामगिरी
निवडणूक काळात अनेक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक घुगे यांचे पथकही कार्यरत होते. या पथकाने जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या; मात्र हद्दपारीचा भंग करून हद्दीत आलेल्या तीन आरोपींना अटक केली.
Sangli police are continuing their manhunt after arresting three of six fugitives in just nine days, ensuring public safety and upholding law and order.Sakal
सांगली : निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाने गंभीर गुन्ह्यातील पसारा व हवे असलेले नऊ आरोपी पकडण्याची कामगिरी बजावली. याबद्दल अधीक्षक घुगे यांच्याहस्ते पथकाचा सन्मान करण्यात आला.