
इस्लामपूर/आटपाडी : पेठ (ता. वाळवा) येथील पद्मश्री मुरलीकांत पेटकर (सध्या रा. पिंपरी, पुणे) यांना आज केंद्र शासनाने अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) जाहीर केला. २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या पेटकर यांना केंद्र शासनाने दिलेला हा दुसरा पुरस्कार आहे. दरम्यान, माणदेशी मातीतील करगणीचा सुपुत्र पॅरा ऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता सचिन सर्जेराव खिलारी यालाही केंद्र शासनाने गुरुवारी मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर केला.