Sangli : प्रोत्साहन अनुदान ६२ हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५० हजार शक्य

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे
farmer
farmeresakal

सांगली : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या राज्यातील २८ लाख, तर जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ७९५ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळू शकणार आहे.

आधार प्रमाणिकरण केलेल्या जिल्ह्यातील ६२ हजार ६४२ शेतकऱ्यांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांनी मंगळवार (ता. १८) पर्यंत आधार प्रमाणिकरणाचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

बॅंकांनी दिलेल्या याद्यांची छाननी पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणानंतर अंतिम याद्या प्रसिद्ध होऊन त्याचे चावडी वाचन होईल. त्यानंतर अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बचत खात्यात २० ऑक्टोबरपूर्वी जमा केली जाण्याची शक्यता आहे. सन २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी दिली.

त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांची कर्जमाफी दिली. नियमित कर्जदारांच्या प्रोत्साहन अनुदानात २५ हजारांची वाढ केली. पण, कोरोनामुळे तिजोरीत पैसाच नव्हता. त्यामुळे कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना अडीच वर्षे वाट पाहावी लागली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच्या निकषात काही बदल करीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत दोन वर्षे कर्जाची नियमित परफेड केली असल्यास त्यांना अनुदान देण्याचा निर्णय झाला.

सन २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ दिला जाणार आहे. प्राप्तिकर भरणारा, शासकीय नोकरदार, आमदार, खासदार, माजी मंत्री, २५ हजारांपेक्षा जास्त मासिक निवृत्तीवेतन असलेल्या व्यक्ती (शेतकरी) कर्जमाफीतून वगळण्यात आल्या आहेत. सर्व विकास सोसायट्या, बॅंकांच्या शाखात अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.

गावोगावी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर त्या याद्या लावून त्याचे वाचन होईल. २० ऑक्टोबरपूर्वी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.

बॅंकनिहाय लाभार्थी...

जिल्हा बॅंक- ५९,१४३

बॅंक ऑफ महाराष्ट्र- १,०३३

बॅंक ऑफ इंडिया- ५७२

स्टेट बॅंक ऑफ इंडिया- ३६८

युनियन बॅंक ऑफ इंडिया- ३८५

जिल्हा बँक शाखांत मदत कक्ष

मत्यू झालेल्या लाभार्थ्यांच्या वारसांनी बँकेत जाऊन वारसनोंद करून घ्यावी. सर्व बँकांच्या शाखा, तालुक्यातील सहकार निबंधक, सहकारी संस्था कार्यालय व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय येथे मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. मुदतीच्या आत पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com