Woman killed with sharp weapon in Sangli district
esakal
जत : जत तालुक्यातील कंठीजवळ असलेल्या मोठेवाडी येथे खरात वस्तीवर ३० वर्षीय विवाहितेचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास (30 year old married woman killed in Sangli) घडली. राजाक्का काशीराम खरात (वय ३०) असे तिचे नाव असून, प्रेमसंबंधातून, भेटण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रियकरानेच हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.