आमदार सावंतांच्या पॅनला धक्का; सोसायटी निवडणुकीत 'NCP'चा झेंडा

निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढत गुलालाची उधळण केली
sangli
sangliesakal
Summary

निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढत गुलालाची उधळण केली

जत : गेल्या पंचवीस वर्षानंतर प्रथमच होऊ घातलेल्या जत विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने १३-० असा विजय मिळवला. या निवडणुकीत आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शेतकरी सहकार विकास पॅनलचा दारून पराभव झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मदतीने जत सोसायटीवर निर्विवाद सत्ता स्थापन केली.
जत सोसायटीसाठी रविवारी ९२८ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरूवात झाली. अवघ्या चार तासात निकालाचे चित्र स्पष्ट झाले. निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत विजयी मिरवणूक काढत गुलालाची उधळण केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चेतन जावीर यांनी काम पाहिले.

नगरपरिषदेच्या निवडणूका डिसेंबरमध्ये होऊ घातल्या आहेत. तत्पूर्वी सोसायटीच्या निवडणूकीने जतच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या निवडणुकीने काँग्रेसवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. मात्र, जत शहराचे कुटुंबप्रमुख म्हणून जतच्या राजकारात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या साथीने विक्रमसिंह सावंत यांना येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत मोठे आव्हान उभे केले आहे.

जत विकास सोसायटी निवडून आलेले उमेदवारांची नावे खालील प्रमाणे
कुलकर्णी मोहन सुभाषराव ५३१ मते, शिंदे स्वप्नील सुरेश ५१७ मते, सावंत प्रमोद विठ्ठलराव ५०५ मते, बेडगे बसाप्पा सिद्धाप्पा ४९७, शिंदे अजित प्रभाकर ४८७, पवार विठ्ठल तुकाराम ४७९, गडदे हनुमंत गंगाराम ४४४, सावंत मनोहर बाळू ४४१, नदापुर जुलेखा मोहद्दिन ५४६, शिंदे सुशीला प्रतापराव ५१०, देवकुळे प्रकाश ज्ञानू ५१९, माळी बाप्पा चन्नाप्पा ५१४, पवार आप्पासो दुर्गप्पा ५५० मते मिळवून विजयी झाले.

शेतकऱ्यांचा विजय आहे

शेतकरी सभासदांनी आमदारांना डावलून विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. हा विजय केवळ आमचा नसून तो सर्व शेतकऱ्यांचा आहे. नक्कीच सत्ताधारी मंडळी शेतकऱ्यांना न्याय देतील. शिवाय, जतकरांनी आमदारांना खरी जागा दाखवली आहे.

- श्री.सुरेशराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते

शेतकऱ्यांचा कौल मान्य

निवडणुकीत यश-अपयश येत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो. यापुढे शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत राहू. ज्यांनी जत शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली. पोकळ घोषणाबाजी करून जनतेला झुलवत ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेल्या संधीचे सोने करावे अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवू.

- श्री. विक्रमसिंह सावंत, आमदार, जत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com