बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; आबांचं स्वप्न पूर्ण - रोहित पाटील

बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; आबांचं स्वप्न पूर्ण - रोहित पाटील
Updated on: 
Summary

कवठे महाकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं एक हाती सत्ता मिळवली.

सांगली - कवठे महाकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) एक हाती सत्ता मिळवली. कवठे महांकाळ नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा आणि शेतकरी विकास आघाडी ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आरआर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) यांनी म्हटलं की, प्रचारावेळी विरोधकांनी वडील हा शब्द वापरण्याऐवजी बाप शब्द वापरला. त्यांचाच धागा पकडून मी विरोधकांना बाप आठवल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं होतं. मला आज आबांची आठवण येतेय. कवठे महाकाळ नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आज राष्ट्रवादीला बहुमत मिळालं, आबांचं स्वप्न पूर्ण झालं असं रोहित पाटील म्हणाले.

कवठे महाकाळ शहरात निवडणूक लढवत असताना शहर कसं असायला हवं, पुढच्या २५ ते ३० वर्षांच्या काळात शहर कसं हवं याचं व्हिजन लोकांसमोर ठेवलं, त्यामुळे लोकांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आज स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येत आहे. आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल अशा भावना रोहित पाटील यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, सहकारी यांनी जी रात्रंदिवस मेहनत घेतली , सुमनताईंच्या अनुपस्थितीत माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण जो विश्वास दाखवला त्याबद्दल रोहित पाटील यांनी आभारही मानले.

बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; आबांचं स्वप्न पूर्ण - रोहित पाटील
सांगली - कवठे महाकांळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीची मुसंडी

तसंच निवडणुकीत काही प्रसंग असे होते की, अचारसंहितेची वेळ असताना, माझ्यासह उमेदवारांना धक्काबुक्की झाली. मात्र जिथं घटना घडली तिथेही आम्ही निवडून आलो. तिथे सर्वसामान्यांच्या हिताचं काय ते डोळ्यासमोर ठेवून काम केलं. आजही ७५ वर्षांनंतर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. निवडणूक संपण्याआधीच प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तयारी सुरु केली होती असं सांगत लवकरच कामे पूर्ण करून लोकांचा विश्वास सार्थ ठरवू असं त्यांनी म्हटलं.

चार प्रभागांसाठी १८ जानेवारी रोजी एकूण ३ हजार ७७२ मतदान होते. त्यामध्ये स्त्री (१५०३) व पुरुष (१५३०) असे ३ हजार ३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर २१ डिसेंबर रोजी झालेल्या १३ प्रभागांसाठीचे मतदान झाले होते. एकूण १७ जागांसाठी मतदान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nikita Kankanwadi Appointed Scientist-B at Central Silk Board
Sagreshwar to Chandoli deer relocation
Sharan Kumar Limbale Remarks on Belgaum Border Dispute Spark Controversy
Raju Shetti reaction on Miraj police action