Why is kharif sowing delayed in Sangli?
esakal
सांगली : मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने खरीप पेरणीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. पावसाअभावी सुरुवातीचे १५ दिवस वाया गेले असले, तरी शेतकऱ्यांच्या हातात आणखी २५ ते ३० दिवस आहेत. जिल्ह्यात केवळ २ टक्के पेरणी झाली (Sangli rainfall deficit agriculture news) आहे. त्यात धूळवाफेवरील भात पेरणी अंतर्भूत आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी ‘थांबा आणि वाट पाहा’ची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.