कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरस्थिती (Sangli, Kolhapur Flood) आटोक्यात ठेवण्यासाठी कर्नाटक शासनाने आलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणी पातळी १५ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटर ठेवावी. त्यापेक्षा ती वाढवू नये, असा संवाद आज कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि विजापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आंतरराज्य बैठकीत झाला. ही बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने झाली.