Koyna Dam Water Release : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू! कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; पाहा किती टीएमसी साठा?

Koyna Dam Water Storage Reaches 83 TMC : आठ दिवसांच्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा ८३ टीएमसीवर पोहोचला आहे. नियंत्रित पाणी विसर्ग सुरू असून कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Krishna River water level today

Krishna River water level today

esakal

Updated on

सांगली : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांपासून झालेल्या पावसाने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे काल (ता.२९) सकाळी नऊपासून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. विद्युतगृहातून १०५० क्युसेक विसर्ग केला जात आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत थोडी वाढ होण्याची शक्यता (Koyna Dam water storage 83 TMC) आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावे, असा सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com