Koyna Dam Water Discharge : कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उचलले! 6 हजार क्युसेकने विसर्ग सुरू; कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam water release latest update : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील आवक वाढली आहे. त्यामुळे धरणातून ६,१२९ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला असून कृष्णा नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Koyna Dam discharge latest update

Koyna Dam discharge latest update

esakal

Updated on

सांगली : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. परिणामी, काल सायंकाळी (ता. ३०) पाच वाजता विसर्ग वाढवण्यात आला असून धरणाचे दरवाजे एका फुटाने उचलून एकूण ६ हजार १२९ क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आज (शुक्रवार) झपाट्याने वाढ होण्याची शक्यता (Krishna River water level today in Sangli) आहे. नदीकाठी सतर्क रहावे, असा इशारा पाटबंधारे विभाग आणि कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com