Sangli Boat Race : 'कृष्णा'काठी होड्यांच्या शर्यतींचा थरार; कवठेसारच्या 'फाकड्या 1010' संघाची बाजी, कसबे डिग्रज बोट क्लब संघ द्वितीय

Sangli Krishna River boat race winner : सांगलीतील कृष्णा नदीपात्रात रंगलेल्या होड्यांच्या शर्यतीत कवठेसार संघाने विजेतेपद पटकावले. कसबे डिग्रज दुसरा, तर इचलकरंजीचा वरद विनायक बोट क्लब तिसरा ठरला.
Sangli boat race 2026 latest news

Sangli boat race 2026 latest news

esakal

Updated on: 

सांगली : गावभागातील केशवनाथ उत्सव मंडळातर्फे कृष्णा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचा थरार सांगलीकरांनी अनुभवला. स्पर्धेत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील १० होडी संघांनी सहभाग घेतला. त्यात प्रथमपासूनच कवठेसारच्या संघाने आघाडी घेत विजेतेपदावर नाव कोरले. कसबे डिग्रज बोट क्लब संघाने द्वितीय, तर इचलकरंजीच्या वरद विनायक बोट क्लबने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या संघांना १५ हजार, ११ हजार, ९ हजार, ७ हजार व ५ हजार रुपये पारितोषिकांसह मानाचे निशाण देण्यात आले. स्पर्धा पाहण्यासाठी सरकारी घाटासह नदीच्या दुतर्फा सांगलीकरांनी गर्दी केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Krishna River Pollution
Koyna Dam Water Release
Krishna River Pollution
Marathi News Esakal
www.esakal.com