Koyna Dam 2100 cusecs water discharge
esakal
सांगली : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर कृष्णा नदीवर लागू करण्यात आलेली उपसाबंदी आता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे तूर्त शेती आणि पिण्यासाठी आवश्यक पाणी उपसा करता येणार (Koyna Dam 2100 cusecs water discharge) आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २९) सायंकाळी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यामध्ये उपसाबंदी शिथिल करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव यांनी सांगितले.