esakal | सांगलीत बंद विरोधात व्यापारी संघटनांचे भीक मांगो आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीत बंद विरोधात व्यापारी संघटनांचे भीक मांगो आंदोलन

सांगलीत बंद विरोधात व्यापारी संघटनांचे भीक मांगो आंदोलन

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महापुर पाठोपाठ गेली दोन वर्ष कोरोनामुळे (covid-19) आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या सांगलीच्या (sangli) बाजारपेठेतील विविध व्यापारी संघटनांनी आज शहरात भीक मांगो आंदोलन केले. कर्मचारी पगार, व्याज, घरपट्टी, पाणीपट्टी, दुकान भाडे, जीएसटी, विज बिल, घर खर्च 'आम्हाला भिकेत द्या' अशी मागणी करत हातात कटोरा घेऊन व्यापारी रस्त्यावर उतरले. महापालिकेसमोरील रस्त्यावर दोन्ही बाजूला हातात फलक आणि कटोरा घेऊन व्यापारी (sellers) उभे होते.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने गेले तीन महिने आत अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद आहेत. मात्र त्यामुळे संसर्ग कमी झालेला दिसत नाही. उलट दुकाने बंद करूनही रुग्ण संख्या वाढलेली दिसत आहे. मात्र बाजारपेठ बंद झाल्याने व्यापारी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. पण प्रशासनाकडून कोणताही दिलासा, मदत मिळाली नाही. यामुळे व्यापारी संघटनांनी भीक मांगो आंदोलन केले.

हेही वाचा: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; नुकसान होऊनही भरपाई मिळत नाही

या आंदोलनास माजी आमदार नितीन शिंदे, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, भाजपचे युवा नेते पृथ्वीराज पवार यांच्यासह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले, लॉकडाऊनमुळे गेले तीन महिने व्यापारी घरात बंदिस्त आहे. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला आहे. मात्र सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही. आमच्या मागण्यांसाठी आम्ही लाचार झालो आहे. त्यामुळे आम्ही आज भीक मांगो आंदोलन केले आहे. शासनाने भिकेत आमच्या मागण्या मान्य कराव्यात.

या आंदोलनात विविध संघटनांचे प्रतिनिधी व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनास अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांनी ही पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनीही आज आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनात सहभाग घेतला, असे श्री समीर शहा यांनी सांगितले.

हेही वाचा: पंकजा मुंडे नाराजगी व्यक्त करतील पण बंड नाही - पाटील

आमदार सुधीर गाडगीळ यांचा पाठिंबा

भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी या आंदोलनास पाठिंबा दिल्याची माहिती समीर शहा यांनी दिली. आमदार सुधीर गाडगीळ हे सांगलीत नसल्याने त्यांनी दूरध्वनीवरून आपला व्यापाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच व्यापाऱ्यांच्या मागण्या न्याय असून यासाठी भविष्यात संघर्ष करावा लागला तरी व्यापाऱ्यांच्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिल्याचे शहा म्हणाले. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनीही दूरध्वनी करून या आंदोलनास पाठिंबा दिला असेही शहा म्हणाले.

loading image