
सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आवारात यावर्षी (१ मार्च ते २३ डिसेंबरअखेर) मिरचीची आवक ८ हजार ६४४ क्विंटल झाली आहे. गेल्यावर्षी २०२३ मध्ये १३ हजार ३१३ क्विंटल इतकी मिरचीची आवक झाली होती. फेब्रुवारी २०२५ मध्ये नव्याने मिरचीची आवक होणार असल्याचे सांगण्यात आले. सन २०२३ मध्ये लाल मिरचीची आवक अधिक झाली.