शाहीनबाग आंदोलनातील नेत्यांची सांगलीत सभा 

1CAA_AND_NRC
1CAA_AND_NRC

सांगली ः एनआरसी, सीएए कायद्याविरोधात सांगलीतील स्टेशन चौकात (वसंतबाग) गेली 32 दिवस आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या शाहीनबाग आंदोलनातील प्रमुख नेत्यांची चौघांची टीम शनिवारी (ता. 22) सांगलीत येणार आहे. सांगलीत यानिमित्ताने स्टेशन चौकात सायंकाळी 6 वाजता भव्य सभा होणार असल्याचे वसंतबाग आंदोलनाच्या संयोजकांनी सांगितले.

सभेसाठी दिल्ली विद्यापीठाच्या स्वाती खन्ना, असोसिएशन ऑफ मुस्लिम इंटिलेक्‍च्युअल मुस्लिमस्चे टी. एम. जियाऊलहक, आसाम अल्पसंख्याक विद्यार्थी संघाच्या सेक्रेटरी हसिना अहमद, जेएनयू दिल्ली विद्यापीठाच्या अमृता पाठक यांचा समावेश आहे. 

समितीचे अय्याज नायकवडी, उमर गवंडी, आयुब पटेल म्हणाले,"" केंद्रातील भाजप सरकारने बेकारी, निष्क्रिय कारभाराचे अपयश लपविण्यासाठी एनआरसी, सीएएसारखे कायदे मंजूर करून जातीय तेढ निर्माण करण्याचा घाट घातला आहे. यातून गोरगरीब, कष्टकरी, सर्वच समाजाला वेठीस धरण्याचा उद्योग भाजप सरकारने केला. पण त्याला देशभरातून विरोध होत आहे. त्याचा केंद्रबिंदू दिल्लीतील शाहीनबाग आंदोलन आहे. त्या आंदोलनास समर्थनार्थ देशभर आता आंदोलने सुरू आहेत. सांगलीतही वसंतबाग आंदोलनात गेल्या 32 दिवसांपासून एल्गार सुरू आहे. हे आंदोलन मुस्लिम महिलांनी हातात घेतले असून, रोज शेकडो महिला सायंकाळी येथे जमून सरकारचा निषेध करीत आहेत. या आंदोलनाला सर्व धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्ते व सर्व समाजघटकातून पाठिंबा मिळत आहे. 

ते म्हणाले, ""पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मोठे आंदोलन सांगलीत होत आहे. या आंदोलनात 64 पेक्षा अधिक राज्यस्तरीय, देशपातळीवरील नेत्यांनी तोफा डागून पाठिंबा दिला आहे. आंदोलनाची दखल शाहीनबागनेही घेतली आहे. तेथे सांगलीतील आंदोलनाचे लाईव्ह प्रक्षेपणही दाखविण्यात आले. आता या आंदोलनात वरील चौघेजण तोफ डागून पाठबळ देणार आहेत. यापुढे आर या पारची लढाई सुरू होणार आहे. शाहीनबागच्या आंदोलनाबाबत दोन दिवसांत तोडगा निघण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार निर्णय झाल्यास 22 तारखेला वसंतबाग येथील आंदोलन या सभेने संपविण्यात येईल. पुढे घर टू घर एनआरसी व सीएए विरोधात जागृती मोहीम राबविली जाईल. नागरिकांना या कायद्यांतर्गत कागदपत्रांची जमवाजमव आणि त्यासाठी चळवळ सुरू करण्यात येणार आहे.'' 

आंदोलनाचा लढा नगरसेविका वहिदा नायकवडी, रईसा रंगरेज, हवा आपाजान, शुभांगी साळुंखे, जयश्री पाटील, रेहाना शेख, सुलताना बेगम, बतुल शेख, आसमा फकीर आदी महिलांनी आक्रमक बनविला आहे. यावेळी शहानवाज फकीर, जाफर शेख, मुनीर मुल्ला, दाऊद ताशीलदार, यासीनखान पठाण, साहील खाटिक, इरफान शेख, वसीम बलबंड, शोएब पन्हाळकर, आक्रमक शेख आदी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com