

Entire district stirred up due to this double incident in Belanki.
Sakal
सांगली : नात्याला काळीमा फासणारी आणि संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या बेळंकी येथे उघडकीस आली आहे. आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून एका व्यक्तीने आपल्याच सख्ख्या साडूची लाकडी दांडक्याने निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर अवघ्या काही तासांतच स्वतःही टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले.