Sangli-Miraj Civil : सांगली-मिरज सिव्हिलला ठोठावला ९.२४ कोटी दंड; वैद्यकीय कचरा प्रक्रिया टाळली
Sangli News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन्ही दवाखाने बंद का करू नयेत? याबाबत अधिष्ठातांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी हरित न्यायालयात धाव घेतली होती. ॲड. ओंकार वांगीकर यांनी पत्रकार परिषदेत बाजू मांडली होती.
सांगली : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मिरज) आणि पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालय (सांगली) मध्ये सांडपाणी आणि वैद्यकीय कचरा प्रक्रिया यंत्रणा नसल्याने हरित न्यायालयाने प्रत्येकी ४.६२ कोटी असा ९.२४ कोटींचा दंड ठोठावला.