Jayant Patil : सांगली-मिरजेच्या ड्रेनेजसाठी २४ कोटी द्या: जयंत पाटील; विटा-तासगावच्या वळण रस्त्यांसाठी निधीची मागणी
Sangli News : तत्कालीन सभागृहाने सांगलीतील ठेकेदारास २५ हजार, तर मिरजेतील ठेकेदारास १५ हजार रुपये रोजचा दंड ठोठावला. त्यापैकी सांगलीतील ठेकेदाराकडून दीड कोटींचा दंड वसूल झाला आहे तर मिरजेतील ठेकेदाराकडून दंडच वसूल केलेला नाही.
सांगली : ‘‘महापालिकेतील सांगली आणि मिरजेच्या दोन्ही भुयारी गटार योजनांसाठी तातडीने २४ कोटी रुपये द्यावेत,’’ अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. यावेळी त्यांनी विटा आणि तासगाव शहरांना वळण रस्त्यांसाठी निधी द्यावा, अशी मागणीही केली.